लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार दुसऱ्या टप्प्यातील पैसे; तर ‘या’ महिलांना 4 हजार 500 रुपये मिळणार; जाणून घ्या कोणाला किती रक्कम मिळणार ? Majhi Ladki Bahin Yojana

Majhi Ladki Bahin Yojana मंडळी सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्याच्या निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमात 1 ऑगस्टपासून अर्ज केलेल्या महिलांना आर्थिक सहाय्य दिले जाईल. सध्या ऑगस्ट महिन्यातील अर्जांची छानणी सुरू आहे, आणि दुसऱ्या टप्यात 45 ते 50 लाख महिलांना पैसे मिळणार आहेत.

लाभार्थी महिलांची स्थिती

राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे हस्तांतरित करण्यात आले आहेत. 10 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरलेल्या महिलांना आतापर्यंत दोन हफ्ते मिळाले आहेत. या महिलांना जुलै आणि ऑगस्टच्या एकत्रित 3000 रुपये प्राप्त झाले आहेत.

Majhi Ladki Bahin Yojana आगामी हफ्ते

आता 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरलेल्या महिलांना एकूण तीन हफ्ते मिळणार आहेत. त्यातल्या काही महिलांना 4500 रुपये प्राप्त होतील, तर आधी दोन हफ्ते मिळालेल्या महिलांना 1500 रुपये प्राप्त होतील.

📢 हे पण वाचा :- मुख्यमंत्र्यांची घोषणा ! आता लाडक्या बहिणींना 1500 रुपये नाहीतर 4500 रुपये मिळणार ?

पहिला हफ्ता व पुढील प्रक्रिया

पहिला हफ्ता 14 ते 17 ऑगस्ट दरम्यान वितरित करण्यात आला. आगामी हफ्ता सप्टेंबर महिन्याच्या 14 ते 17 तारखेच्या दरम्यान वितरित होण्याची शक्यता आहे. 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरणाऱ्या महिलांच्या अर्जांची पडताळणी करून 15 तारखेला हफ्ता मिळण्याची अपेक्षा आहे.

सप्टेंबर महिन्यातील निधी

सप्टेंबर महिन्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचे पैसे एकत्रितपणे दिले जाणार आहेत.आम्ही कोणालाही वंचित ठेवणार नाही. तीन लाख पाच हजार खात्यात गेले आहेत. उर्वरित खात्यातही पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे असे सांगितले गेले आहे.

📢 हे पण वाचा :- लाडकी बहीण योजनेसाठी बँकेत आधार कार्ड कसं लिंक कराल? ऑफलाईन, ऑनलाईन आणि एसएमएसद्वारे होईल झटपट काम!

योजनेवर टीका

काही लोकांनी या योजनेला थांबवण्यासाठी हायकोर्टात याचिका केली होती. हायकोर्टाने त्यांना परत केले आहे आणि योजनेला लागू ठेवले आहे. योजना बंद करण्याच्या प्रयत्नांमध्ये काही लोक सहभागी झाले आहेत, पण आम्ही थांबणार नाही, असेही सांगितले गेले आहे.

Leave a Comment