अनलिमिटेड कॉलिंग, डेटा प्लान बंद होणार? Jio, Airtel वोडाफोन युजर्ससाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ! Unlimited calling and Data

Unlimited calling and Data मित्रानो भारतीय मोबाईल युजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रिलायन्स जिओ, एअरटेल, आणि वोडाफोन आयडिया या प्रमुख दूरसंचार कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज च्य दरात वाढ केल्यानंतर भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने जुने केवळ

वॉईस कॉलिंग आणि एसएमएस पॅक पुन्हा लॉन्च करण्याच्या संदर्भात सूचना मागवल्या होत्या. आता या विषयावर जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया यांनी TRAI समोर आपली भूमिका मांडली आहे.

या कंपन्यांनी स्पष्ट केले आहे की त्यांच्या रिचार्ज प्लान्सचा डिझाइन असा आहे की युजर्सना वेगळा प्लान खरेदी करण्याची गरज नाही. टेलिकॉम कंपन्यांच्या मते त्यांच्या सर्व योजनांमध्ये युजर्सला समान सुविधा मिळाव्यात यासाठी ते टेरिफ प्लान्स तयार करण्यात आले आहेत. यामुळे युजर्सना कोणत्याही वेगळ्या किंवा अतिरिक्त प्लानची आवश्यकता भासणार नाही.

📢 हे पण वाचा :- BSNL 4G: Jio, Airtel अन् Vi कोमात ! 150 रुपयांपेक्षा कमी किंमतीत फ्री कॉलिंग, डेटा देतंय BSNL वाचा डिटेल्स ! 

Unlimited calling and Data

मित्रानो त्याच बरोबर या कंपन्यांचे म्हणणे आहे की वेगळे वॉईस व एसएमएस प्लान्स लॉन्च करण्याची आता आवश्यकता नाही. कारण डेटा हा आधुनिक दूरसंचार क्षेत्राचा मुख्य घटक बनला आहे. अनलिमिटेड डेटा आणि वॉईस कॉलिंगच्या माध्यमातून युजर्सना एक उत्तम अनुभव दिला जात आहे. त्यामुळेच पे-अज-यू-गो मॉडेलच्या ऐवजी अनलिमिटेड ऑफर्स अधिक फायदेशीर ठरत आहेत, असे या कंपन्यांनी नमूद केले आहे.

📢 हे पण वाचा :- महिन्याला 20,500 रुपयांपर्यंत कमाई करण्याची ही मोठी संधी: Post Office च्या स्कीमबद्दल तुम्हाला माहिती का ?वाचा डिटेल्स !

TRAI ने आपल्या इंडस्ट्री कंसल्टेशन पेपर्समध्ये या गोष्टींचा उल्लेख केला आहे. एअरटेलने उत्तर देताना म्हटले की सध्या उपलब्ध असलेले प्लान्स सोपे आणि सर्वसामान्यांसाठी समजण्यास सोपे आहेत. वॉईस, डेटा, व एसएमएस प्लान्समुळे युजर्सला एक चांगला अनुभव मिळत आहे. हे रिचार्ज प्लान्स कोणत्याही शुल्कशिवाय आहेत मित्रनो या मुळे युजर्सना मिळणाऱ्या सेवांचा स्पष्ट आढावा घेता येतो.

TRAI ने केलेल्या सर्वेक्षणात 91 टक्के सब्सक्रायबर्स मान्य करतात की सध्याचे टेलिकॉम प्लान्स स्वस्त आहेत. 93 टक्के युजर्सच्या मते हे प्लान्स बाजारातील मागणीनुसार योग्य आहेत. एअरटेलने म्हटले आहे की जुने प्लान्स पुन्हा आणल्यास युजर्सना कॉलिंग आणि डेटा यांसाठी वेगळे रिचार्ज करावे लागतील, ज्यामुळे त्यांच्या सेवांचा अनुभव कमी होईल. त्यामुळे असे प्लान्स टाळावेत, असा आग्रह कंपन्यांनी धरला आहे. सध्या, TRAI ने या संदर्भात अंतिम निर्णय घेतलेला नाही.

Leave a Comment