Aditi Tatkare

Aditi Tatkare लाडकी बहीण योजनेत दिलेली 31 ऑगस्ट  मुदत आता अंतिम असणार नसून अर्जाची प्रक्रिया ही निरंतर चालणार आहे, अशी माहिती महिला व  बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. 

लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 31 ऑगस्ट ठेवण्यात आली होती. मात्र ही मुदत आता अंतिम असणार नसून अर्जाची प्रक्रिया ही निरंतर चालणार आहे.

त्यामुळे 31 ऑगस्टनंतर देखील महिलांना अर्ज करता येणार आहेत, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे महिलांना दिलासा मिळणार आहे. 

Aditi Tatkare विशेष मोहिम राबविण्याचे आवाहन 

महिला व  बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी राज्यातील सर्व विभागातील आयुक्त, जिल्हाधिकारी,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महिला बाल विकास अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फन्सिंगद्वारे संवाद साधला.

माझी लाडकी बहीण योजनेची नवीन ताजी यादी अपडेट पहा तुमचं नाव आलं का त्यात ? कशी व कुठे पहाल यादी ?

या संवादात त्यांनी लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहिम प्रत्येक जिल्ह्यात राबवावी आणि  येत्या 17 ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त महिलांच्या बँक खात्याशी आधारकार्ड जोडून घ्यावेत असे आदेश दिले आहेत. 

लाडकी बहीण योजनेत अर्ज केलेल्या आणि बँक खाती आधारकार्डशी जोडलेल्या महिलांच्या खात्यात 17 ऑगस्ट रोजी दोन महिन्याचे हफ्ते जमा होणार आहेत. ज्या महिलांची बँक खाती आधारकार्डशी जोडलेली नाही आहेत.

त्यांच्या खात्याशी आधारकार्ड जोडणी झाल्यानंतर पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे लाभार्थी महिलांनी बँकेशी आधारची जोडणी करून घ्यावीत. तसेच लाभापासून वंचित राहू नये, असे आवाहन आदिती तटकरे यांनी केली आहे.