माझी लाडकी बहीण योजनेची नवीन ताजी यादी अपडेट पहा तुमचं नाव आलं का त्यात ? कशी व कुठे पहाल यादी ? Ladki Bahin Yojana List

Ladki Bahin Yojana List महाराष्ट्रात 1 जुलै 2024 पासून माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आली असून, या योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे. माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना लाभाचे वितरण १७ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे.

आतापर्यंत जवळपास 1 कोटी 35 महिला पात्र ठरल्या असून, त्यांच्या खात्यात 17 ऑगस्ट रोजी पैसे जमा होणार आहेत. माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थींना त्यांच्या बँक खात्यात येत्या 17 ऑगस्ट रोजी लाभाचे दोन हप्ते मिळणार आहेत.

Ladki Bahin Yojana List ऑनलाईन लाभार्थी यादी कशी तपासणार?

लाडकी बहीण योजना पात्रता यादीमध्ये नाव आले आहे की नाही हे तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने जाणून घेता येणार आहे. ज्या महिलांनी योजनेंतर्गत अर्ज केले आहेत.

📢 हे पण वाचा :- या नागरिकांना मिळतात 30 भांडे संच तुम्हाला माहिती का ? नसेल माहिती तर हा जीआर पहा व भरा फॉर्म !

त्या महिला या योजनेशी संबंधित त्यांच्या अर्जांची स्थिती तपासू शकतात. योजनेच्या लाभार्थींनी यादीतील त्यांचे नाव तपासण्यासाठी पूर्ण करावयाच्या स्टेप्स खालीलप्रमाणे.

  • महिलांना सर्वप्रथम त्यांच्या फोनवर प्ले स्टोअरवरून ‘नारी शक्ती दूत’ ॲप डाऊनलोड करावे लागेल.
  • त्यानंतर पुढील नवीन पेजवर विचारलेली सर्व माहिती नीट भरुन मग अर्ज उघडावा लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला मुख्यपृष्ठावर माझी लाडकी बहीण योजनेचा पर्याय दिसेल.
  • तो पर्याय निवडायचा आहे. मग तेथे तुम्हाला लाभार्थी यादी पाहण्याचा पर्याय सापडेल.
  • त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचे यादीमध्ये नाव आहे की नाही तपासू शकता.

तुमचे नाव लाभार्थी यादीत समाविष्ट असल्यास, योजनेंतर्गत तुमच्या बँक खात्यात पैसे पाठवले जातील. जर तुमचे नाव लाभार्थी यादीत नसेल, तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

📢 हे पण वाचा :- आता शेतकऱ्यांना विहीर खोदण्याबरोबर सोलर पंपसाठी 100% अनुदान तुम्ही केला की नाही अर्ज ? पहा जीआर इथं….?

Leave a Comment