लाडकी बहीण योजनेत या जिल्ह्यातील 37 हजार अर्ज रद्द जिल्हा प्रशासनाने दिली माहिती तुमचं तर नाही ना ? Majhi Ladki Yojana 2024

Majhi Ladki Yojana 2024 37 हजार अर्ज बाद होणार?: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ठाणे जिल्ह्यातून एकूण 5 लाख 3 हजार 80 अर्ज पात्र ठरले आहेत. मात्र 37 हजार अर्ज त्रुटीयुक्त आहेत. त्यामुळे ते बाद होण्याची शक्यता आहे. या योजनेचा लाभ सर्वच महिलांना हवा आहे.

त्यासाठी महिलांची विविध सेंटर्सवर मोठी गर्दी होत आहे. मात्र ज्या महिलांचे बँक खाते अद्याप आधार कार्डशी संलग्न केलेले नाही, अशा महिलांनी संबंधित बँकेत जाऊन बँक खाते आधार कार्डशी संलग्न करण्याचे काम करून घ्यावे असे आवाहन

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड व जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) संजय बागूल यांनी केले आहे.

Majhi Ladki Yojana 2024

तसेच त्रुटी असलेल्या अर्जांच्या बाबतीत संबंधित महिलांनी तात्काळ आशा सेविका/ अंगणवाडी सेविका/ ग्रामसेवक किंवा ज्यांच्याकडून अर्ज भरुन घेतला असेल त्यांच्याशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे.

लाडकी बहीण या योजनेंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थी महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात दरमहा एक हजार पाचशे रुपये (1500) रक्कम जमा केली जाणार आहे.

📢 येथे क्लिक करून पहा कोणाचे अर्ज होणार बाद….?

यासाठी संबंधित महिलेचे बँक खाते आधार संलग्न (आधार सीडिंग) केलेले असणे आवश्यक आहे. अन्यथा अडचण निर्माण होऊ शकते, त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हे आवाहन केले आहे.

Leave a Comment