Monsoon Forecast ! अलर्ट ! राज्यातील या जिल्ह्यांना आज पुन्हा पावसाचा अलर्ट पहा कोणते जिल्ह्यांना अलर्ट ?

Monsoon Forecast : महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे, मात्र तरी देखील राज्यातील काही भागांमध्ये आजही हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आज मुंबईत वातावरण ढगाळ राहणार असून, हलक्या पावसाची शक्यता आहे.

पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे, मात्र पावसाचा जोर कमी असेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

पुणे शहर परिसरात पावसाने विश्रांती घेतली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरल्याचे दिसून येत आहे. आज पुण्यात 31 अंश सेल्सिअस कमाल तर 23 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

Monsoon Forecast 2024

विदर्भात हवामान विभागाकडून आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे, विदर्भात आज मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

📢 हे पण वाचा :- मंत्री तटकरे ! माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज न केलेल्या व पैसे न मिळालेल्या महिलांसाठी गुड न्यूज आली तुम्ही वाचली का ?

हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. दुसरीकडे मराठवाड्यात देखील आज पावसाचा इशारा देण्यात आला असून, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

Leave a Comment