महिन्याला 20,500 रुपयांपर्यंत कमाई करण्याची ही मोठी संधी: Post Office च्या स्कीमबद्दल तुम्हाला माहिती का ?वाचा डिटेल्स ! Post Office Investment

Post Office Investment पगारदार व्यक्तीसाठी निवृत्तीवेतन हे निवृत्तीनंतरचा आर्थिक आधार बनतो. त्यामुळे अनेक लोक निवृत्तीनंतरची आर्थिक स्थिरता साधण्यासाठी त्यांच्या उत्पन्नाचा मोठा भाग वाचवतात. या संदर्भात योग्य गुंतवणूक करणं अत्यंत महत्त्वाचं असतं.

जर तुम्ही निवृत्तीनंतर चांगला परतावा मिळवण्यासाठी योजना शोधत असाल, तर आम्ही तुम्हाला एक प्रभावी पर्याय सांगणार आहोत. ही योजना पोस्ट ऑफिस अंतर्गत उपलब्ध आहे आणि केंद्र सरकारद्वारे ८ टक्क्यांपेक्षा अधिक व्याज दर दीले जाते.

Post Office Investment ज्येष्ठ नागरिक बचत योजना

मंडळी आपण पोस्ट ऑफिस सीनियर सिटिझन सेव्हिंग्स स्कीम (एससीएसएस) बद्दल बोलत आहोत जी केंद्र सरकारद्वारे संचालित आहे. इतर बचत योजनांच्या तुलनेत ही योजना अधिक व्याज दर देते.

हे पण वाचा :- लाडकी बहीण योजनेसाठी बँकेत आधार कार्ड कसं लिंक कराल? ऑफलाईन, ऑनलाईन आणि एसएमएसद्वारे होईल झटपट काम!

या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी पाच वर्षांचा आहे. या योजनेंतर्गत फक्त ६० वर्षांच्या वयावर असलेल्या व्यक्तींना गुंतवणूक करता येते. सध्या या योजनेवर ८.२% व्याज दर मिळतो.

मासिक २०,५०० रुपये प्राप्त करा

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत ३० लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला दरवर्षी सुमारे २ लाख ४६ हजार रुपयांचे व्याज मिळेल. मासिक आधारावर हे २०,५०० रुपये इतकं होईल.

योजनेत खाते उघडण्यासाठी वय ६० वर्ष असावे लागते, परंतु ५५ ते ६० वयोगटातील स्वेच्छानिवृत्त (व्हीआरएस) घेणारे व्यक्तीही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

एससीएसएस खात्यात कमीत कमी १,००० रुपये डिपॉझिट करून खातं उघडता येईल आणि तुम्ही १,००० रुपयांच्या पटीत रक्कम गुंतवू शकता. योजनेत एकूण ३० लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते.

हे पण वाचा :- लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार दुसऱ्या टप्प्यातील पैसे; तर ‘या’ महिलांना 4 हजार 500 रुपये मिळणार; जाणून घ्या कोणाला किती रक्कम मिळणार

यावर मिळणाऱ्या परताव्यावर कर आकारला जातो. ५०,००० रुपयांपेक्षा जास्त व्याज असल्यास टीडीएस भरावा लागतो, पण फॉर्म १५ जी/१५ एच भरल्यास व्याजावर टीडीएस कापला जाणार नाही.

Leave a Comment