Punjab Dakh पंजाब डख यांचा नवा अंदाज 24 तारखेपर्यंत सतर्कतेचा इशारा तुमच्या जिल्ह्यात कसा असेल अंदाज ?

Punjab Dakh : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता राज्यामध्ये 18 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट दरम्यान जोरदार पाऊस होईल असे पंजाबराव डख साहेबांनी सांगितलेले आहे. या तारखे दरम्यान मुंबई त्यासह अमरावती,बुलढाणा, वर्धा, अकोला, यवतमाळ आणि नागपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचं आगमन होईल.

मराठवाड्यातील बीड,नांदेड, हिंगोली, जालना, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजी नगर मध्ये जोरदार पाऊस होईल. असा अंदाज पंजाबराव डख साहेबांनी व्यक्त केला आहे.

त्याबरोबरच महाराष्ट्रातील नंदुरबार, नाशिक, धुळे व पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यात सुद्धा पावसाचा आगमन होणार आहे. असेही डख साहेबांनी सांगितलेले आहे.

Punjab Dakh हवामान अंदाज

  • राज्यात दररोज भाग बदलत पाऊस हजेरी लावेल. नद्या,नाले भरून वाहतील असा पाऊस होणार.
  • धरणे भरतील असा पाऊस होईल.
  • सर्व शेतकरी जनतेने आपापली काळजी घ्यावी.
  • डख साहेबांनी सांगितलेले आहे की शेवटी अंदाज आहे वारे बदलले की वेळ ठिकाण बदलत असते.

📢 हे पण वाचा :- आता पीएम घरकुल घरकुल योजनेत मोठा बदल आता या नागरिकांना मिळणार हक्काचे घर पहा नवीन निर्णय !

येत्या तीन दिवसात या जिल्ह्यात जोरदार पाऊस

मागच्या आठवडाभरापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उघडीप दिलेल्या पावसाने आता दमदार हजेरी लावलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागात जोरदार पाऊस झालाय.

आता तिथे येत्या तीन दिवसांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. मित्रांनो सध्याला आपण पाहतोय की राज्यात पाऊस ऊन असा खेळ चालू आहे. तर काही ठिकाणी कडाक्याचे ऊन दिसत आहे.

ठाणे व मुंबई मध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस हा नव्हता, पण गेल्या 24 तासांमध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस झालाय.

आज सुद्धा ठाणे त्याचबरोबर मुंबई मध्ये जोरदार पावसाचा अंदाज सांगितलेला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे.

Leave a Comment